राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना 'राजकीय काविळ' झाल्याने सत्ताधाऱ्यांचे सर्व काही 'पिवळे' दिसत आहे, अशी टीका आज मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या नावे विद्यापीठाने 'व्हॉइस ऑफ देवेंद्र' स्पर्धा ठेवली, तरी त्यांना पोटात दुखण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार काका शरद पवारांचा आदर्श समोर ठेवून व्यक्तिद्वेषाचे राजकारण करत आहेत, तर मुख्यमंत्री पद हे कोणत्या एका पक्षाचे नसते.