कारंजा तालुक्यातील कामठवाडा येथे शेतकर्याच्या अंगावर वीज पडून ते गंभिररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी देण्यात आली आहे. निलेश रमेश जाधव वय 45 वर्ष रा. कामठवाडा असे जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव असून, वीजेमुळे त्यांच्याजवळ असलेली छत्री जळाली असून, दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव मात्र बाल बाल बचावला आहे.