आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12च्या सुमारास ठाण्यातील सीकेपी हॉल येथे मनसेची बैठक पार पडली या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे. कालपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. त्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा असं म्हणाले आहेत.