शनिवार दिनांक 13 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान पन्नास किलोमीटर दूर देवलापार वडांबा येथून निमखेडा येथे शेत कामासाठी दहा-बारा महिला मजदूर आल्या. व शेतात काम करू लागल्या. मात्र अचानक पाऊस सुरू झाला व आकाशात वीज कडाडून शेतात काम करणाऱ्या महिलांपैकी एक 17 वर्षीय युवती निहारिका संजय बिच्चुलाल रा. कुरई (म. प्र.) हल्ली मुक्काम वडांबा देवलापार हिचे अंगावर विज पडल्याने यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 13 सप्टेंबरला सायंकाळी चार ते साडेचार वाजता च्या दरम्यान घडली.