भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पद मला देऊ केले असून हे फार मोठे चॅलेंज आहे. येणाऱ्या काळात पालघर जिल्हा हा भाजपमय जिल्हा राहणार, येणाऱ्या पंधरा वर्षात भारतीय जनता पक्षाचेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ठेवण्याचे काम ही माझी जबाबदारी असून खासदार,आमदार आणि कार्यकर्ते सोबत आहेत. स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवण्याचे कार्यकर्त्यांचे मत असल्यास त्यांच्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवणर प्रतिक्रिया भाजपचे पूनर्नियुक्त पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी दिली आहे.