महानगर पालिकेतर्फे सिव्हर व सेप्टिक टँक कामगारांसाठी “नमस्ते” उपक्रमाबाबत माहिती मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे माहिती सत्र घेण्यात आल्याची माहिती मनपा तर्फे १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता देण्यात आली. सोमवारी सेप्टिक टँक व सिव्हर सफाई कामगार यांच्यासाठी तयार केलेल्या केंद्र शासनाच्या “नमस्ते” योजना बाबत माहिती देण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय व सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांचा उपक्रम आहे.