अंबाजोगाईत मंगळवारी रात्री 11:30 च्या सुमारास, खूनाची गंभीर घटना घडली आहे. अंबासाखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे एका युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली.हत्या झालेल्या युवकाचे नाव अविनाश शंकर देवकर असून त्याचे वय ३५ वर्षे आहे. तो अंबाजोगाई शहरातील रायगड नगर येथे राहत होता. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.