सोलापूर ते पुणे महामार्गावरील कोंडी पुलाजवळ अपघात होऊन निलंगा तालुक्यातील पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अपघात बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास झाला. शिवाजी यादवराव बिराजदार (वय वर्षें ४८), बालाजी वसंतराव गोमसाळे (वय वर्षें ४०), अनिता वसंतराव गोमसाळे (वय वर्षें ७०), ज्ञानेश्वर पाडुरंग बिराजदार (वय वर्षें ६५) व शोभा ज्ञानेश्वर बिराजदार (वय वर्षें ६०, सर्वजण रा. तामलवाडी, ता. निलंगा, जिल्हा लातूर) अशी जखमींची नावे आहेत.