वाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका कुख्यात दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत ७ लाख 50 हजार रुपये आहे. आरोपी सावरगाव येथे लपून बसला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता, त्याने अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तो चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विकायचा.