उदगीर नगरपरिषदेच्या आरक्षणाची सोडत ८ ऑक्टोबर रोजी नगरपालिका सभागृहात घेण्यात आली,उदगीर नगरपालिका अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी सुटले असून सदस्य पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले,एकूण २० प्रभागात २० महिला व २० पुरुषांचे आरक्षण जाहीर करण्यात आले, अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेला सुटल्याने उदगीर नगरपालिकेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, उदगीर नगरपालिकेचे वार्ड निहाय आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या उपस्थित पार पडले