आज दिनांक 28 ऑगस्ट दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील शेतकऱ्यांचे रस्त्याच्या मागणीसाठी आज रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले मात्र उपविभागीय अधिकारी नसल्याने सदरील आंदोलन करते ही पूर्ण दिवस उपाशी उपविभागीय अधिकारी यांची वाट बघत कार्यालय समोर बसले होते मात्र कार्यालयातील दुसऱ्या अधिकाऱ्यांनी साहेब येणार नाही तुम्ही दोन तारखेला कार्यालयात या असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले