पाटोदा तालुक्यातील शिंदे वस्तीचा संपर्क शनिवार दि 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता, पुराच्या पाण्यामुळे पूर्णपणे तुटला आहे. या भागातील रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. शाळकरी मुले, आजारी रुग्ण आणि महिला यांचीही गैरसोय होत असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना