खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. NDRF चे पथक सुद्धा दाखल झाले आहे. माहितीनुसार, मंगेश पाटील आणि त्याच्यासोबत आणखी एक युवक नदीपत्रात उतरले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही बुडू लागले. त्यापैकी दुसऱ्या तरुणाने कसाबसा पोहत किनारा गाठला. मात्र मंगेश पाटील हा युवक नदीच्या पाण्यात बुडाला