स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृह तिरोडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत एक दिवसीय तालुका स्तरीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले.दरम्यान याप्रसंगी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी उपस्थिती दर्शविली.या उपक्रमातून ग्रामविकास व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सबलीकरणाला नवे बळ मिळेल, असा विश्वास आहे. असे याप्रसंगी बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले.