चंद्रपूर 28 ऑगस्ट रोज हायवा ट्रक व प्रवासी ऑटोच्या भीषण अपघातात खामोना व पाचगाव येथील सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या अपघाताच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज 31 ऑगस्ट रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालय राजुरा येथे बैठक घेऊन मूर्तक व जखमीच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देऊन जखमींवर प्रभावी उपचार करण्याची सूचना केली