लाखनी येथील समर्थ शाळेच्या परिसरातील विहीरमध्ये बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडीस आली. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास लाखनी येथील समर्थ शाळेच्या परिसरातील विहिरीत उघडकीस आली. मंगेश दगडु यादव (५६) रा मुरमाडी असे मृतकाचे नाव आहे. घटनेतील मृतक ईसम घरून निघून गेल्याचे बोलले जात आहे. मृतक मंगेश यादव याला अर्धांगवायू झालं असून तो काही दिवसा पासून आजारी होता. मानसिक स्तिथी खराब झाली असल्याचे परिसराततील नागरिका कडून बोलेल जात आहे.