भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिम्मा हिला आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०० वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एस.डी.आर.एफ.) पथकाच्या मदतीने पामूलगौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नदी पार करून तिला तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सकाळी तिने गोंडस कन्येला जन्म दिला. अशी माहिती तहसीलदार भामरागड कडून प्राप्त झाली आहे.