महावितरण मार्फत 11 केव्ही टेंभोडे लाईनवर देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे या कारणास्तव टेंभोडे लाईनवरील विद्युत पुरवठा शुक्रवारी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे टेंभोडे, आल्याळी, आदर्शनगर, काशीपाडा, वळण नाका, मोर्सन इंडस्ट्री, भक्ती इंडस्ट्री, गुरुदेव इंडस्ट्री, हायटेक इंडस्ट्री या परिसरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम होणार असून विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.