मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील श्रीकृष्ण उत्तम लहासे यांच्या शेतातील विहिरीवरील आणि सौर ऊर्जेची ५१० फूट लांबीची, सुमारे ११ हजार ५०० रुपये किमतीची काळ्या रंगाची इलेक्ट्रिक केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे.याप्रकरणी श्रीकृष्ण लहासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध धामणगाव बढे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.