भरधाव पिकअपचा ओव्हरटेक करत असताना दुचाकीला धक्का लागल्याने अपघातात दुचाकीवरील पती पत्नी जखमी झाल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खंडाळा वैजापूर रोडवर रोटेगाव शिवारात आव्हाळे वस्तीजवळ घडली होती.या प्रकरणात पीक अप चालकाविरोधात वैजापूर पोलिसांत 3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणात भगिनाथ सखाराम ठोंबरे वय 53 वर्षे राहणार भायगाव यांनी फिर्याद दिली आहे.