सेलिब्रेशन जवळील दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 150 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर व्यावसायिकावर ही पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्