बीड जिल्ह्यात आ. पंडित समर्थक आणि प्रा.लक्ष्मण हाके यांच्यात झालेल्या राड्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मंगळवार दि.26 ऑगस्ट दुपारी 12 पासून पुढील पंधरा दिवसांसाठी जमावबंदी लागू केली आहे. या काळात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गेवराईत आमदार विजयसिंह पंडित यांच्या बॅनरवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि पंडित समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे तणाव वाढला असून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्य