गोदावरी नदीला महापूराचा धोका; आ. हिकमत दादा उढाण यांचे नागरिकांना स्थलांतराचे आवाहन जायकवाडी धरणातून तब्बल २ लाख क्युसेक पाणी गोदावरी नदीत झेपावले असून नदीकाठच्या गावांमध्ये महापूराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत दादा उढाण यांनी नागरिकांना तात्काळ स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.