राहुरी येथील भारत गॅस कंपनीचे अधिकृत वितरक असलेल्या लक्ष्मी गॅस एजन्सीचे अकाउंटट व आरडगाव येथील रहिवासी अनिल बाळासाहेब म्हसे (वय-४०) यांचे आज शुक्रवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. अनिल म्हसे हे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घराजवळ असलेल्या गोठ्यात जनावरांचे चारा-पाणी करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले माञ त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.