29 सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील सिद्धार्थ नगर येथे इलेक्ट्रिक पोलवर चढून लाईन दुरुस्तीचे काम करीत असलेल्या कंत्राटी कामगाराचा करंट लागल्याने मृत्यू झाला. मृतकाचे नाव प्रिन्सकुमार टेंभुर्णे वय 28 वर्ष असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी राजेश टेंभुर्णे यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलीस स्टेशन कोराडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.