पालघर शहरात दुचाकी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. गणेशकुमार सिंग यांनी त्यांची दुचाकी पालघर शहरातील देवीसहाय रोड अंबामाता मंदिर परिसरात ठेवली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरली आणि चोरटा पसार झाला. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.