मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प सध्या वादग्रस्त ठरत असून, या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी संत एकनाथ भवन येथे बैठक आयोजित केली. या बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बैठकीदरम्यान स्थानिक नेते रा. पा. कटेकर यांनी सरकार आपल्या घरावर उठत असेल तर “विठ्ठल मंदिराचा अनावश्यक भाग देखील बाधित म्हणून कॉरिडॉरमध्ये घ्यावा” अशी परखड मागणी केली.