झाडांवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांमुळे सर्वत्र एक मनमोहक दृश्य दिसते. या काळात अनेक पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात रमलेले असतात व त्यामुळे वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्षांचा वावर पाहायला मिळतो.अशाच एका सुंदर दृश्याला आज 30ऑगस्ट रोजी सायं 5 वाजताच्या सुमारास आमच्या कॅमेऱ्याने टिपले आहे. पिंपरी मेघे भागातील स्वागत कॉलनी परिसरात काही खास चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येत होता.त्यातीलच एका चिमणीला आम्ही जवळून पाहिले.या चिमणीचं नाव आहे सुगरण पक्षी! याला बाया पक्षी किंवा शिंपी पक्षी असे म्हणतात.