जिल्हा रुग्णालय, वाशिम येथे आज मंगळवारपासून ४० व्या नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या उपक्रमातून समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती करून अधिकाधिक लोकांना या पुण्यकार्याशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चव्हाण, प्रशिक्षणार्थी आयएएस आकाश वर्मा,उपस्थित होते.