आज शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या विविध प्रमुख मागण्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरावर विविध शेतकरी संघटना तर्फे एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु हा मोर्चा थांबविण्यासाठी शासनाने दडपशाही करून काटोल उपविभागीय क्षेत्रातील चारही पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन करणाऱ्यांना 28 ऑगस्ट च्या रात्रीच स्थानबद्ध करून नजर कैदेत ठेवले आहे. यामुळे पुन्हा एकदा शासनाची दडपशाही समोर येत आहे.