चंदनझीऱ्यातून हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना... जालना शहरातील चंदनझीरा परिसरातून हजारो मराठा आंदोलक आज दि.28 गुरूवार रोजी रात्री साडेसात च्या सुमारास शेकडो गाड्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे काल (27 ऑगस्ट) रोजी लाखो समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाल्यापासून राज्यभरातून टप्प्याटप्प्याने मराठा आंदोलकांची फौज आझाद मैदान गाठण्यासाठी सज्ज झाली आहे. या वेळी गणेशोत्सवाच्या आनंदसोहळ्यासह मराठा समाज आरक्षणाच्या लढ्यातही सामील झाला असून, ही दोन वेगवेगळी परंतु भावनिकदृष्ट्या