शिरूर शहरातील इंदिरानगरमध्ये मानवी नात्यांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कॅन्सरग्रस्त आजीकडे भेटायला आलेल्या नाती-नातजावयानेच तिच्या घरातील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली.या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.