हिंगोली अकोला राष्ट्रीय महामार्गाची नव्याने निर्मिती तीन वर्षांपूर्वी झाले असून या महामार्गावर तामसी फाटा ते पंचाळा दरम्यान वाशीम बायपास निर्माण करण्यात आला असून या सिमेंट रस्त्यावर एकबुर्जी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ या सिमेंटच्या रस्त्या वर मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून हा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी कोकलगाव येथील रहिवाशी तथा स्वामी विवेकानंद हायस्कूलचे संचालक नारायणराव काळबांडे यांनी केली.