जालना जिल्ह्यातील दावलवाडी येथे स्वतःच्या मुलीचा बापानेच गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती शनिवार दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. दरम्यान पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दावलवाडी येथील हरी बाबुराव जोगदंड याने त्याच्या मुलीचा गळा आवळून खून केला आणि नंतर तो खून पचविण्यासाठी तीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, तो बनाव पोलीसांनी हाणून पाडला.