वेणा नदीत बुडालेल्या शुभमचा मृतदेह २४ तासांनंतर पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश मिळविले.मृतक शुभम संतोष पिल्लेवान २८, रा. अमरनगर येथील ऑटोचालक त्याच्या मित्रांसह वेणा नदीवर गेला होता. पोहताना शुभम नदीत बुडाला. पोलिसांनी त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र तो आढळला नाही. ठाणेदार जितेंद्र बोबडे यांच्या मार्गदर्शनात सकाळी दहा वाजतापासून पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.तीन तासांनंतर शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.