रामटेक शहराच्या बायपास रोड वरील नागारा तलावात रविवार दिनांक 31 ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान एका वृद्ध अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. रामटेक पोलिसांनी याची दखल घेत पंचनामा करून शव शवविच्छेदन केंद्र रामटेक येथे ओळख पटविण्यासाठी ठेवला होता. ही बातमी सर्वत्र पसरतात मृतकाच्या नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली. मृतकाचे नाव वामन कानोजी दोडके वय 78 वर्षे रा. बोरडा सराखा असे असल्याचे सांगण्यात आले आहे.