माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नुकतीच अहेरी येथील ज्येष्ठ नागरिक आणि जुन्या सहकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हा दौरा राजकीय भेटीपेक्षा जुन्या संबंधांना उजाळा देणारा आणि व्यक्तिगत आपुलकी व्यक्त करणारा ठरला.