मागच्या काळात शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शासनावर आर्थीक ताण वाढला आहे,आवाजावी खर्चामुळे आज निधी द्यायला सरकारकडे पैसे नाही,त्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर आहे,ठेकेदार देखील आत्महत्या करत आहे. या आवाजाची खर्चावर कोणीतरी नियंत्रण ठेवला पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी करत महाराष्ट्रावर 10 लाख कोटींचा कर्ज असल्याचे आज 10 सप्टेंबर रोजी सकाळी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.