माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने उद्या रविवारी मेगाब्लॉक घोषित केला असल्याची माहिती रेल्वेकडून आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ च्या सुमारास एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डात रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल, दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत.