गुलामगिरीसारखी वागणूक देत मजुरांवर अत्याचार; लोणी व्यंकनाथ येथे पोलिसांची धडक कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे मजुरांना गुलामगिरीसारखी वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन महिन्यांपासून आरोपी शिवाजी दादा कोकरे (वय ३२) व संपत आप्पा कोळपे (वय ३३) यांनी मजुरांना धमकावून, शिवीगाळ करून व जेवण न देता बळजबरीने काम करवून घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले. मजुरांना शेतात, गोठ्यात व मंडप उभारणीसाठी डांबून ठेवले जात होते.