रत्नागिरी येथे श्री रत्नागिरीचा राजा गणेशाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात रात्री उशिरा पार पडला. विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ढोल ताशांचा निनादात संपूर्ण शहर भाविकांच्या एकत्रित जय घोषाने दणाणून गेले. यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांनी एकत्रित ढोल ताशे वाजवत पारंपरिक वाद्याच्या गजरात सहभाग घेतला. त्याच्या सहभागामुळे मिरवणुकीचे वैभव अधिकच खुलून आले.