आता युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये युवक काँग्रेसच्या ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांनीच युवक काँग्रेसच्या नियुक्ती अवैध्य असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील लोकांना हाताशी धरून कोणतेही ठोस कारण नसतानाही कोणतेही पक्षविरोधी कार्य न करता कुणाल राऊत यांच्यावर सोडा बुद्धीने कार्यवाही करण्यात आली आहे आणि अकार्यक्षम शिवराज मोरे यांना अध्यक्ष बनविण्यात आले आहे असा आरोप लावण्यात आला.