23 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही शिक्षणाचे, संशोधनाचे अंतिम ध्येय हे लोक कल्याणासमवेत विकासाला गती आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक महत्वपूर्ण असते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या व कृत्रिम गुणवत्तेच्या या काळात देशाला जर अधिक सुरक्षित आणि भक्कम करायचे असेल तर युवकांनी आपल्या संशोधनाची व्याप्ती जागतिक ज्ञानाच्या कक्षेसमवेत उंचावत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.