रविवारी सायंकाळी पनवेल शहरातील मुख्य रस्त्यावरील एका गॅरेजला अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती. आगीत गॅरेज मध्ये उभे असलेली दोन वाहन जळून खाक झाले आहेत. वेळीच घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.