कारंजा शहरात दोन भोंदूबाबांनी एका व्यावसायिकाला बोलण्यात (संमोहित)भूलवून सुमारे ६० हजार रुपयांची अंगठी लंपास केल्याची घटना घडलीये. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ दिनांक 10 सप्टेंबर रोजी समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. दुकानात दोन भोंदू बाबा दाखल झाले. भोंदू पाहून व्यावसायिकाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर साधूनी मधुर संवाद साधत व्यावसायिकाने आपल्या हातातील सुमारे ६ ते ७ ग्रॅम वजनाची ६० ते ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी साधूंना स्वखुशीने दिली.