मराठा आरक्षण व मनोज दादा राणी पाटील यांच्या समर्थनार्थ आज विटा येथे शंकर नाना मोहिते व इतर मराठा समाजाने आज चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रामध्ये दिनांक 29 रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चा संदर्भात सर्वांनी उपस्थित राहून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोर्चामध्ये सहभागी राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा असा जयघोष करण्यात आला