आमगाव तालुक्यातील ग्राम सरकारटोला येथील शेतशिवारात औषध फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी ७ ते ८ वाजता दरम्यान घडली. देवलाल सोबिलाल रहांगडाले (४९) रा. सरकारटोला) असे मृताचे नाव आहे.शुक्रवारी सकाळी देवलाल रहांडाले हे गावाजवळील शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा अचानक ते शेतशिवारात बेशुद्ध पडल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. गावकऱ्यांनी तातडीने त्यांना आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकर