नांदुरा शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी हे मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मधून बसत आहेत,त्यामुळेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच अनेक वेळा अपघात सुद्धा झालेले आहेत. याबाबत सुरेशदादा पेठकर यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मुख्याधिकाऱ्याकडे मागणी केली आहे.