जिल्ह्यातील वढवी येथील आप्पास्वामी विद्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पोलीस कॅडेट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण सत्रादरम्यान ठाणेदार मांगीलाल पवार आणि वाशीम येथील कवायत प्रशिक्षक विश्वती पखाले यांनी विद्यार्थ्यांना पोलीस कवायतीचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. यावेळी त्यांनी मूल्य शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवली.