उदगीर शहरातील मकबूल बावडी परिसरात अनेक नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचल्याने ग्रह उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे, नागरिकांना मात्र रात्र जागून काढावी लागली आहे,नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष करत आहेत, या परिसरात एक सार्वजनिक विहीर असून विहीर पाण्याने भरल्यामुळे घरात पाणी साचले आहे,नागरिकांना घरात झोपण्यासाठी इंच भर जागा शिल्लक राहिली नाही,नागरिकांनी माध्यमासमोर व्यथा मांडल्या